Namo Shetkari Yojana Maharashtra : नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला मिळणार

Namo Shetkari Yojana Maharashtra : नमस्कार जे शेतकरी नमो शेतकरी योजना च्या लाभाची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सोशल मीडिया मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महासन्माननिधीच्या 6 व्या हप्त्याचे 96.26 लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे असे सांगितले. आणि लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

Namo Shetkari Yojana Maharashtra

योजना नमो शेतकरी महासन्मान नीधी योजना
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी 
कोणामार्फतमहाराष्ट्र राज्य सरकार 
कधीपासून2023 24 
लाभाची रक्कमप्रतिवर्षी सहा हजार रुपये 
टप्पेतीन हप्ते 
कितवा हप्तासहावा

2169 कोटी रुपये राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार आहेत. 

नमो शेतकरी महासन्माननिधी योजना याअंतर्गत तब्बल 2169 कोटी रुपये एवढे रक्कम ज्या शेतकऱ्यांचा आधार व डीबीटी लिंक केलेले बँक अकाउंट असतील त्या खात्यात जमा होणारा असल्याची माहिती देण्यात आली आहे. अशी पोस्ट सोशल मीडियावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे त्यामुळे 96.26 लाख शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

February 2019 पासून केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार पात्र शेतकरी कुटुंबास 6000/* प्रतिवर्षी देण्यात येतात. म्हणजेच प्रती हप्ता 2000/* हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येते. त्यासाठी शेतकऱ्यांना आपले बँक अकाउंट आधार आणि डीबीटीची संलग्न करून घेण्याची गरज असते. 

प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना

केंद्र शासनाची प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत भर घालणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य शासनाकडून सुरू केलेली योजना आहे. ही योजना राज्य शासनाकडून 2023 / 24 पासून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राबविण्यात येत आहे. आणि शेतकरी बांधवांसाठी ही खूप चांगली योजना आहे. 

प्रधानमंत्री किसान योजनेच्या अंतर्गत प्रतिवर्षी प्रतिशतकरी 6000/* रुपये केंद्रशासन देत आहे त्यामध्येच राज्य सरकारने आणखीन 6000/* रुपयांची भर घालत शेतकऱ्यांना चांगलीच आर्थिक मदत केली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी 12000/* रुपये जमा करत आहे त्यामुळे या दोन योजना खूप चांगल्या मानल्या जात आहेत कारण त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक मदत होत आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथून 26 ऑक्टोबर 2023 रोजी, नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचा पहिला हप्ता शेतकरी यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. तर आज सहावा हप्ता नमो शेतकरी योजनेचा वितरित केला जाणार आहे त्यानुसारच संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2169 कोटी रुपये जमा होणार असल्याची माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये खूप आनंदाचे वातावरण आहे. 

शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासंघ निधी योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नसते महाराष्ट्रातील ज्याही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे अनुदान मिळालेले आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. जर तुम्हाला या अगोदर सुरू झालेला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेस चा लाभ मिळालेला नाही तर त्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी अर्ज करा आणि या दोन्हीही योजनांचा लाभ घ्या. 

Namo Shetkari yojana Installment 2025

महाराष्ट्र राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजेच नमो शेतकरी महासन्माननिधी योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना मजबुती आणि मदत करण्यासाठीच ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारे सहाय्य केले जाते. 

Namo Shetkari yojana उद्देश :

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मजबुती देणे शेतमालाच्या किमतीमध्ये सुधारणा करणे त्यांना आधुनिक तंत्रज्ञान व पिकांच्या व्यवस्थापनास मदत करणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नांना चालना देणे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ मिळवता येतो. या योजनेअंतर्गत जी माहिती आवश्यक आहे ती त्यांना दिली जाते आणि जे साधनं लागतात ते पण पुरवले जातात.

Namo Shetkari yojana पात्रता :

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांची पात्रता असणे आवश्यक आहे त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन उत्पन्न आणि काही माहिती तपासली जाते त्या आधारावरच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवता येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही सर्व माहिती बरोबर असणे आवश्यक आहे. त्यासाठी काही कागदपत्रे ही सादर करणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे पुरेसे डॉक्युमेंट्स नसतात त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यामध्य अडचणी येऊ शकतात.

Namo Shetkari yojana प्रमुख फायदे :

  • आर्थिक मदत 
  • धान्यासाठी योग्य किंमत 
  • विम्याचा लाभ
  • टेक्नॉलॉजीचा वापर
  • कार्यशाळा आणि प्रशिक्षण

आर्थिक मदत :

नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज मिळण्याची सुविधा आहेत तसेच सरकार यातून अनुदान योजनांद्वारे आर्थिक मदत ही मिळते 

धान्यासाठी योग्य किंमत : 

शेतातील धान्याला आणि मालाला योग्य किंमत मिळते. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी जास्त अडचणी येत नाहीत आणि मालविक्रीची प्रोसेस सहज होते.

Namo Shetkari Yojana Maharashtra

टेक्नॉलॉजीचा वापर :

शेतीमध्ये टेक्नॉलॉजी चा वापर कसा करायचा याबद्दल शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ले दिले जातात. यामुळे शेतकरी चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आणि त्यांचे उत्पादन वाढू शकतात. 

कार्यशाळा आणि प्रशिक्षण : 

शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी नियमितपणे कृषी प्रशिक्षण आणि कार्यशाळा भरवल्या जातात. कार्यशाळा आणि प्रशिक्षण यांचा फायदा असा होतो की जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाते आणि त्यांचा अवलंब कसा करायचा याविषयी प्रशिक्षण दिले जाते. namo shetkari samman nidhi yojana

Visit our Website :

निष्कर्ष :

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आणत आहे आणि त्यांना आर्थिक बळ देत आहे. या योजनेच्या सहकार्याने शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपये मिळतात त्यामुळे त्यांना आर्थिक मदत देखील होते. प्रशिक्षण आणि कार्यशाळामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीकामात प्रगती घडते. राज्य सरकारच्या आई या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होत आहे.

Treading

More Posts